Home महाराष्ट्र निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पालघर : ‘राष्ट्रवादी परिवार संवादयात्रे’च्या चौथ्या पर्वाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोकण विभागातील वसई येथून केली. यावेळी त्यांनी वसई -विरार कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली यावेळी आपला पक्ष हा आदरणीय शरद पवार साहेबांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा : भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात वाढला पाहिजे, प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा. तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे. मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे. त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असंही जयंत पाटील यांनी बैठकीत म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! राज ठाकरेंची प्रकृती बिघडली; पुणे आणि मुंबईमधील मेळावे रद्द

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीप्रमाणे तुमचेही शतक पूर्ण करा; अमित शहांना खासदार कोल्हेंकडून अनोख्या शुभेच्छा

“काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदारापाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांनी पक्षाला ठोकला रामराम”