मुंबई : राज्यातली शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून हजार शासकीय व खाजगी रुग्णालयांत ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत हे उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट वरुन दिली आहे.
राज्यातल्या ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समूह संसर्गाची लक्षणं अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी जनतेनं घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा,असं आवाहन करतो, असंही अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेनं पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व आपण सारे देशवासी मिळून ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकू, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.
राज्यातली शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून हजार शासकीय व खाजगी रुग्णालयांत ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत हे उपचार केले जाणार आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन
क्वारंटाइन लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांनाजेलमध्ये टाका; मनसेची मागणी
पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील