Home महत्वाच्या बातम्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण

मुंबई : जगभरात करोना व्हायरसचा विळखा पसरत चालला .त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे नागरिकांचं घरबसल्या मनोरंजन व्हावं, यासाठी केंद्र सरकारने गाजलेली रामायण मालिकेचं प्रक्षेपण पुन्हा सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी ही देखील पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आता ही मालिका 30 मार्चपासून पुन्हा दाखवण्यात येणार आहे.

30 मार्चपासून दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मालिकेचं प्रक्षेपण होणार आहे. झी मराठीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे.

वाहिनीच्या या निर्णयाने शंभूप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा शंभूमहाराजांचा ओजस्वी इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन

क्वारंटाइन लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांनाजेलमध्ये टाका; मनसेची मागणी

पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी मराठीत संवाद