Home देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन

नवी दिल्ली : जगभरात करोना व्हायरसचा विळखा पसरत चालला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या 900 च्या वर गेली आहे.  शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र आपल्याला कोरोनाचा जिकीरीने सामना करायचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

भारताची कोरोनाशी लढाई सुरू असून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक मदत देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे जनतेतून आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हणाले.

देशातील जनतेला माझं आवाहन आहे की देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावं. या फंडाचा उपयोग पुढील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठी करतायेईल. पीएम-केअर्स फंडात कितीही रूपयांचं योगदान स्वीकारलं जाईल, असंही मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान, जमा झालेल्या आर्थिक ताकदीच्या बळावर देशाच्या आपत्कालिन परिस्थितीशी लढण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

क्वारंटाइन लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांनाजेलमध्ये टाका; मनसेची मागणी

पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी मराठीत संवाद

शरद पवार यांनी लिहलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र