Home महाराष्ट्र पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील

पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील

सांगली : आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

कृपया या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं, असं जयंत पाटील म्हणाले. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

दरम्यान, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समिती आम्ही सुरू केली. परंतु बाजार समितीतही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. लोकं त्या ठिकाणी गर्दी का करत आहेत हे समजत नाही. लोकांनी आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी मराठीत संवाद

शरद पवार यांनी लिहलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांच राज्य सरकारला समर्थन; म्हणतात…

लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवारांच स्पष्टीकरण; म्हणतात…