आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
या भेटीत बीड जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मात्र आता या बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाचा : “जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले याचं उत्तर द्यावं”
दरम्यान, गडकरी यांनी आमच्या भागातील विकास कामे केली आहेत. परळी जिल्ह्याला भरभरून दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जागच्या जागीच त्यांनी कामाचा निपटारा केला. ती गडकरींची स्टाईल आहे. मात्र, या भेटीत अजूनही कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पण माझ्या कारखान्यांच्या समस्या मांडायच्या असतील, तर मी अमित शहा यांची भेट घेईन, असं पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
आमचं ठरलंय, भाजपसोबत जायचं नाही; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान
पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात