Home महाराष्ट्र बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे

बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, माळेगावच्या संचालकानं हाती बांधलं घड्याळ

‘बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, असा हल्लाबोल नितेश राणेंनी यावेळी केला.

तुम्हाला पहिल्यापासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणूनच तुम्ही पूजापाठ केले. राजसाहेब, राणेसाहेबांना षडयंत्र करुन बाहेर केलं. रावते, शिंदेंसारख्या कडवट शिवसैनिकांना माझं आवाहन आहे. मी लहान आहे. पण तुम्हाला कधीच संधी मिळणार नाही. ठाकरे परिवार सोडून एकजणही मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

मराठवाड्यात मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेणार ‘ही’ आक्रमक भूमिका