Home महाराष्ट्र “मोठी बातमी! किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात”

“मोठी बातमी! किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कराड : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापूरला जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या केली.

पोलिसांनी पहाटे 4.30 वाजता कराड येथून सोमय्या यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, ‘प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, काल रात्री सोमय्या मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले, तेंव्हा सीएसटीवर पोलिसांनी त्यांना ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मध्ये बसू देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या आणि पोलिसांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली होती. तसेच ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मध्ये बसल्यानंतर सोमय्या म्हणाले होते की, ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच सरकार रस्त्यात मला कुठेतरी अटक करेल. आणि नेमकं तसंच झालं.

महत्वाच्या घडामोडी –

सरकारच्या दडपशाहीचा हिशेब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही; अतुल भातखळकरांची टीका

पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेग; पंकजा मुंडे लिहिणार नितीन गडकरींना पत्र

मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला अधिक आवडतो- प्रीतम मुंडे

किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…