Home पुणे किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय्या यानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर ह्याची माहिती घेऊन सांगेन, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. पुण्यातील बालेवाडी भागात अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

मला याबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो. लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा., असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“आधी पोलिसांशी बाचाबाची, तरीही किरीट सोमय्या निघाले कोल्हापूरला जाण्यासाठी”

कोंबडं कितीही झाकलं तरी…; किरीट सोमय्यांना आलेल्या नोटीसवरून प्रवीण दरेकर आक्रमक

सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही; सोमय्या यांच्या नोटीसवरून चंद्रकांत पाटलांची टीका

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…