Home महाराष्ट्र ‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज्य...

‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली  आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

“मंदिरे आणि रंगमंदिरे उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका. गेल्या दीड वर्षात लोककलावंत, रंगकर्मी, बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आणलीत. मंदिराजवळ अगरबत्ती, धूप-कापूर, प्रसाद विकणाऱ्यांचे हालहाल केलेत त्याचे काय?” असा सवाल करत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, या सगळ्यांचा आणि भाजपाचा रेटा वाढला म्हणून आज निर्णय घ्यावा लागला. देवाची आणि भक्तांची, नाटक, सिनेमा प्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केलीत. असं सांगतानाच कोकणात “चिपीला” जाताय तर रवळनाथासमोर हातजोडून माफी मागा, रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसान भरपाई द्या. ती मिळायलाच हवी, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग ; शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा

धोनीला लागली एक वेगळीच सवय, बायको साक्षी म्हणते…

टक्केवारीसाठी एकमेकांसोबत फुगड्या खेळताय का? गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल