आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपाकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. आता भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
शिवसेनेचा खरा चेहरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेनेने युतीसाठी कधी प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजपाने युती तोडली, असं म्हणणं चुकीचे आहे . विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे 105 आमदार आले तेव्हा असं वाटलं की आता भाजपा कुणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन करणे कठीण आहे. तेव्हाच शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली. आगामी 2024 मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
स्व.बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जरी कमी केला तरी, शिवसेनेची किंमत शून्यापेक्षा कमी आहे..! @BJP4Maharashtra @MiLOKMAT @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi pic.twitter.com/NHx9XCVQ7i
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे, मी आता शांत बसणार नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा
सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे
“शुभमन गिल-वेंकटेश अय्यरची विस्फोटक खेळी; कोलकाताचा आरसीबीवर एकतर्फी विजय”
फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्यांच्या फाईल बाहेर येणार- नाना पटोले