आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच गाडीत दिसल्यानं पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणा आलं.
आज नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी तसेच भाजपमधील नेते एकाच मंचावर आहेत. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे दोघेही या कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय.
दरम्यान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रूग्णालयात; तीन दिवसांपासून उपचार सुरू”
पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय- अजित पवार
“विकासाच्या नावावर शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”
ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि… ; मुख्यमंत्र्यांनंतर राऊतांचीही भाजपला टाळी