आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलच तापायला लागलं आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीतजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला सल्ला दिला आहे.
भाजपने आरपीयआसोबत मिळून निवडणूक लढली पाहिजे. तसेच भाजपने आरपीआयला 10 ते 12 जागा दिल्या पाहिजेत, असं रामदास आठवले म्हणाले. ते गोरखपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून भाजपने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल, असंही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
सत्तेत आलो तर 24 तासात मोफत वीज मिळणार; आम आदमी पक्षाची घोषणा
महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजराती नाही; मनसेचा ICICI बँकेला दणका
“…म्हणून उद्धव ठाकरेंनी केला जगनमोहन रेड्डींना फोन”
पिंपरीत राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेतील ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश