पेगॅससचे खरे बाप देशातच, आधी त्यांना शोधा; सामनातून हल्लाबोल

0
369

मुंबई : पेगॅसस स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या समोर आल्यानं देशात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

काही मूठभर लोक आणीबाणी लादल्याचा काळा दिवस प्रतिवर्षी साजरा करत असतात, मात्र पेगॅसस हल्ला तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. या हल्ल्याचे खरे बाप आपल्याच देशात आहे, पहिले त्यांना शोधा, असं सामनात म्हटलं आहे.

पेगॅसस हा निवडक हिन्दुस्थानींवर झालेला सायबर हल्ला आहे आणि केंद्र सरकारच्या संमतीशिवाय तो होऊच शकत नाही. त्यामुळे पेगॅससमार्फत केल्या गेेलेल्या हेरगिरीची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न सामनातून यावेळी करण्यात आला.

दरम्यान, हे देशाला आणि लोकशाहीला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे षडयंत्र आहे., असं गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं होतं. गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं हे आश्चर्य आहे. ते सांगू शकतील का हे काम नेमकं कोण करतंय?, असा सवालही सामनातून करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

“मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत चक्क मास्क लावला”

मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य शिवसेनेत- अतुल भातखळकर

“महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here