Home महाराष्ट्र “महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”

“महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”

मुंबई : ठाण्यातील आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसार माध्यमांनी समोर आणलं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू आहेत. ही सरकारसाठी शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी यावेळी केला.

कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत. असं असताना दुसरीकडे डान्सबारवर बंदी असतानाही ते राजरोसपणे सुरू आहेत., असं दरेकरांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली असली तरी तात्पुरती आणि तुटपुंजी कारवाई केली गेली आहे. तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी दरेकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल”

मी ‘सामना’ वाचत नाही, उगाच सुर्यावर थूंकू नका; नाना पटोलेंचा घणाघात

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

पालकमंत्री बदला सांगली जिल्हा वाचवा; निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीकास्त्र