पुण्याची मस्तानी, चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
334

मुंबई : प्रश्नम या संस्थेने देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. या सर्वेक्षणाच्या निकालावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोडची मिसळ “जगात भारी” पुण्याची मस्तानी “जगात भारी” चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री “जगात भारी”…”असं ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान,  उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 49 टक्के मतदारांनी नोंदवलं.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही- नवाब मलिक

“वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं काैतुक”

“राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”

“भारताचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोना पाॅझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here