Home महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत राणेंची पाठराखण केली आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आहे., असं रामदास आठवले म्हणाले. तसेच राज्याच्या प्रश्नांकडे जेवढं लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नसल्यानं राणेंनी हे वक्तव्य केलं, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्याचा विकास होणं गरजेचं असून, जनतेला मदत करणं आवश्यक आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची भावना नसून मुख्यमंत्र्यांनी अधिक सजग व्हावं आणि राज्याचा विकास व्हावा हीच भावना होती, असं म्हणत रामदास आठवलेंनी राणेंची पाठराखण केली.

महत्वाच्या घडामोडी –

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना शाप दिलाय, त्यामुळे राणेंची अधोगती सुरू आहे- भास्कर जाधव

नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे- गुलाबराव पाटील

“राणे-शिवसेना वाद वाढला! पुण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात सोडल्या कोंबड्या”