Home पुणे शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ विचाराने का होत नाही?; राज...

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ विचाराने का होत नाही?; राज ठाकरेंचा सवाल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या एका भव्य मुलाखतीमधील एका प्रश्नाचा दाखला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर पुन्हा टीका केली आहे.

शरद पवारांची मुलाखत घेतली, तेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले. तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज न होता शाहू-फुले आंबेडकर विचाराने होते. छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी शरद पवारांना केला.

दरम्यान, आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आणि यशवंतराव चव्हाणदेखील वाचले. महाराष्ट्राला जातीपातीच्या विचारातून बाहेर येणे गरजेचे आहे, हा वक्तव्यामागचा अर्थ होता. गेल्या 15-20 वर्षांत शाळा-कॉलेजमध्ये, मित्रामित्रांमध्ये जाती आल्या. यात प्रबोधनकारांच्या वाचनाचा प्रश्न कुठून आला? प्रबोधनकारांचे सोयीनुसार तुम्ही वाचन करता का?, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, आता प्रशासनानंही करून दाखविलं, पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल”

नितीन गडकरींनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र…

नारायण राणेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले…

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाॅप-5 मध्ये पटकावलं स्थान”