नागपूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून नाना पटोले यांनी आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. कारण, नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी लावली.
पटोले यांच्या उपस्थितीत नागपुरात आज काँग्रेसकडून व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री सुनील केदार उपस्थित होते. मात्र, ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थिती पाहायला मिळाली.
दरम्यान, या कार्यक्रमात काँग्रेसकडून आज स्वातंत्र्यसेनानींचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही नितीन राऊत उपस्थित नव्हते.
महत्वाच्या घडामोडी –
युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदींना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल
बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाल्या…
राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा