Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”

“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”

कराड : राज्यातील शेतकरी आणि जनता वादळ, अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी ठाकरे सरकारने स्वत:च्या जाहिरातबाजीवर 160 कोटी रुपयांची उधळपट्टी केली, असं म्हणत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार अशीच होईल, अशी टीका खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे.

की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गर्जना विधिमंडळात केली. त्यास दीडवर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोटय़ा जाहिरातींवर 160 कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी 150 कोटी रुपये कर्ज माफीसाठी दिले असते, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता, असं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यास कर्जमुक्त करण्याची घोषणा उध्दव ठाकरेंनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्याला वेठीस धरले गेले आहे. राज्य सरकारच्या फसवणुकीचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला असताना सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली आलिशान गाडय़ांमधून पर्यटन करण्यात दंग आहे, असा आरोप रणजितसिंह निंबाळकरांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही नाही, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटांमुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असंही रणजितसिंह निंबाळकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली; काँग्रेस

प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे

ठाकरे सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”; आशिष शेलारांची टीका

आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल