Home महाराष्ट्र कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव...

कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, सामान्यांना मुंबई लोकलने प्रवास प्रवास करण्यास अनुमती देण्यात येत आहे, असं सांगितलं. अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक

“पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”

“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना फोन

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो”