Home पुणे “हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”

“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”

पुणे : खासदार अमोल कोल्हे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्य केलं. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय?” , अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमोल कोल्हेंवर केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे, असं शिवाजीराव आढाळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझं सर्वांशी चांगलं आहे. मोहिते आणि अमोल कोल्हे हे सध्या हवेत आहेत, त्यांना वाटतं आपल्यामुळ सर्व काही चाललं आहे. शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेने मोठा बहुमान दिलेला आहे. महत्वाची पदं दिलीत. अशा पद्धतीने पांग फेडत आहात, असंही शिवाजीराव आढाळराव पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील

काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

“2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”

“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन”