Home महाराष्ट्र “मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

“मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

मुंबई : मालाडच्या कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या कारवाईला विरोध केल्याने अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसाठी आज सकाळी कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे.  त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

“ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…”; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“पंकजा मुंडेंची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे”