Home देश “13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद”

“13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद”

नवी दिल्ली : येत्या 13 एप्रिलपासून देशात सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही महत्त्वाची कामं प्रलंबित असतील, तर उद्या म्हणजेच सोमवारी (12 एप्रिल) पूर्ण करून घ्या. कारण उद्या कामं पूर्ण नाही केली तर तुम्हांला बराच काळ वाट पाहावी लागेल.

एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. खाली दिलेल्या यादीत जाणून घ्या एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत.

या 4 दिवस बँका राहणार बंद

13 एप्रिल – मंगळवार – उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव

14 एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू

15 एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल

16 एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू

दरम्यान, सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला जात नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”

पृथ्वी- शिखरच्या खेळीपूढे चेन्नईचे गोलंदाज फेल; दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेटवनी विजय

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल- देवेंद्र फडणवीस