लंडन : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली यावेळी ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआयनं याबाबतची माहिती दिली आहे.
इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही मागील काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होता. ऋषभ पंत लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. त्यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाणार नाही. सुदैवाने संघातील इतर खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”
तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरू नका; रोेहित पवारांचा भाजपला टोला
“13 राज्यातील सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच BEST CM! पटकावलं नंबर 1 स्थान”
मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या