बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली आहे.
विनायक मेटे यांनी नारायणगडाचं दर्शन घेतलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सुडबुद्धी देण्याचं साकडं घातलं आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु., असं विनायक मेटेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा मेटेंनी यावेळी दिला. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील
“महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय बंद?”
मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट- देवेंद्र फडणवीस