मुंबई : उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करा, असं आवहान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केलं आहे. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून, काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“करोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?”
नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील
‘हे सरकार आहे की सर्कस?’; अतुल भातखळकरांची अनलॉकवरुन टीका
…त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही; हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर