भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण अखेर रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, असा हल्लाबोल फडणवीसांनी सरकारवर केला होता. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस खोटारडे आहेत. भाजप सरकारनेच ओबीसींचे मुडदे पाडले. आता चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहे, असा पलटवार नाना पटोलेंनी यावेळी केला. ते भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आम्ही ओबोसींचे हितचिंतक आहोत, अशी भूमिका भाजपने आता घेतली असली तरी ओबिसी समाजाने यांना ओळखलं आहे. ओबीसी समाज भाजपला त्यांची जागा लवकरच दाखवून देईल, असं म्हणत पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट
“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”
नितीन गडकरी चांगला माणुस पण चुकीच्या पक्षातला- अशोक चव्हाण