राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

0
213

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नये अशी विनंती संजय राठोड यांनी यावेळी केली. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्यासोबतच ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.

राज्यातील महिला, मुलींच्या मनात याविषयी काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत राज्यातील जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायला हवीत. राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का? असा प्रश्न दरेकरांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापाैरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड

“नोकरीच्या देण्याच्या आमिषाने तरूणीला कारमध्ये बसवलं, चालत्या कारमध्ये केला बलात्कार”

“सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”

“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here