तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

0
166

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. हल्ली त्यांच्या वक्तव्यांमध्ये बेस नसतो. तुम्ही इतरांचे बाप काढणार, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का? कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई दरवर्षी कशी तुंबते?; नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना पत्र

पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळन 4 जणांचा मृत्यू

राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; ‘या’ माजी आमदाराचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here