Home महाराष्ट्र “सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली”

“सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली”

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे राज्यातील मृतांची संख्याही वाढत आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारमधील लोकांची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. या संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाहीत, औषधे जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे, असं विखे पाटील म्हणाले.

कोरोना संबंधी महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहिलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा दिली खरी, मात्र प्रत्यक्षात सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका विखे पाटलांनी यावेळी केली.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थेच्यावतीने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकार, निकम्मा कारभार; नाशिक व्हेंटिलेटर प्रकरणावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”

“हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर