Home महाराष्ट्र केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

संजय राऊत  यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल”

“माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं घर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयची धाड”

“माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं घर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयची धाड”

“होमक्वारंटाईन रूग्णास तपासण्यासाठी डाॅक्टर घरी येणार”