Home महाराष्ट्र …तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. यावेळी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत बंगळुर येथे बोलताना सीमावादावर न्यायालयात आमची बाजू सिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची भूमी सोडणार नाही, असं बसवराज बोंमई म्हणाले.

दरम्यान, कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेले महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली कर्नाटकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत बोंमई यांनी महाराष्ट्राला इशारा दिला आहे.