मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत अनिल देशमुख क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
“15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते.
या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.
आता नेमके कोण दिशाभूल करते आहे? pic.twitter.com/adujxqxaBU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं पोलिसात केली तक्रार दाखल”
“अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली”
राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत