Home महाराष्ट्र “सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”

“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”

सातारा : सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, असं म्हणत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा सधलाय.

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला तर ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजप अपवाद आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

भाजप विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्टं निश्चित असून त्यामुळेच ते एकसंघ आहेत. भाजप राज्यातील सर्वच्या सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये एकोपा आहे. टीमवर्क आहे. त्याचं फळ निश्चितच दिसून येईल, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर”

थोरातांचे वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं- अतुल भातखळकर