Home देश “राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”

“राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”

कोटा : राजस्थानच्या हाडौतीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 18 जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोटा जिल्ह्यातील सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे राजस्थान हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये 4 अल्पवयीन मुलं आणि एका महिलेचाही सहभाग आहे.

कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील प्रकरणात आरोपींनी मुलीवर 9 दिवस अमानुष अत्याचार केले. नराधम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना ती विव्हळत होती, जिवाच्या आकांतानं ओरडत होती. त्यावेळी तिला शांत करण्यासाठी नराधम अंमली पदार्थ देऊन तिला मारहाण करत होते. पीडित तरुणी मला घरी जाऊ द्या, अशी विनंती नराधमांकडे वारंवार करत होती. मात्र, तिला चाकू दाखवून गप्प करण्यात आलं.

ही घटना 25 फेब्रुवारी 2021 रोजी घडली आहे. आरोपी चौथमल आणि महिला आरोपी बुलबुल उर्फ पूजा जैन हे दोघे अल्पवयीन मुलीला बॅग देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे 3-4 मुलांना बोलावलं आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवलं. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आलं. त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेऊन तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले, अशी माहिती शरद चौधरींनी दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, झालावाड आणि गागरोनमधील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. 5 मार्चला आरोपी महिला बुलबुल उर्फ पूजा जैन हिने अल्पवयीन पीडितेला झालावाडमधल्या सुकेतमध्ये आणून सोडलं. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि 6 मार्चला पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा