Home महाराष्ट्र “शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

“शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

मुंबई : कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. 40 हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबतचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे”

“महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी अभिनेत्री पूजा सावंतचा नवीन खास लूक”

“भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण”

“शरद पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही”