उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या नेत्याला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

0
145

मुंबई : मुख्यमंत्र्यांची अवस्था गजनी सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी झाली आहे, असं वक्तव्य माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्याला आता शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल बोंडे यांनी सवंग लोकप्रियतेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावरती जे विधान केलं. ते म्हणजे अनिल बोंडे यांनी स्वतःची लायकी ओळखून सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते सुनील प्रभूं यांनी अनिल बोंडे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात जे काम या महाराष्ट्रात केलेलं आहे. त्याबाबत देश-विदेशातील मीडियानं त्यांना प्रशस्तिपत्रक दिलं आहे. अनिल बोंडेंनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं दिली. विदर्भातील प्रश्नांची जाण असल्याचं दाखवून विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं फसवलं. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बोंडेंना घरी बसावं लागलं, असंही सुनिल प्रभूं म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर

“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here