महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

0
191

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाउनची मुदत आणखी एक आठवड्याने, येत्या 15 जुलैपर्यंत वाढवली आहे.जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने या कालावधीत बंद राहणार आहेत.

गेल्या आठवडभरात जिल्ह्यामध्ये एकूण 152 करोनाबाधित रूग्ण सापडले असून 70 जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये लागण होण्याचे प्रमाण जास्त आढळून आल्यामुळे ही मुदत वाढवली आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंतच्या 24 तासात नव्याने 32 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बाधित रुग्णांची एकूण संख्या 813, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 522 झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धवजी पण गारद का?; फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला

ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?; संजय राऊतांचा शरद पवारांना सवाल

आशिया चषक होणार का नाही?; सौरव गांगुलीने केला निर्णय जाहीर

सामनाच्या रोखठोकमध्ये ‘हे’ छापून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here