Home क्रीडा आशिया चषक होणार का नाही?; सौरव गांगुलीने केला निर्णय जाहीर

आशिया चषक होणार का नाही?; सौरव गांगुलीने केला निर्णय जाहीर

नवी दिल्ली :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकाचं आयोजन रद्द करत असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे.

“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम आखले आहेत. सरकारी नियमांच्या अधीन राहून आपल्या पुढची कार्यवाही करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताचा पुढील आंतराष्ट्रीय सामना किंवा मालिका कधी होईल हे आताच सांगू शकत नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

शेवटी खेळाडूंचा आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा आहे आणि खेळाडूंचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असल्याने आम्ही आशिया चषकाचं आयोजन रद्द करत आहोत. त्याचबरोबर यंदाची आयपीएल भारातमध्येच व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही सौरव गांगुली म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

सामनाच्या रोखठोकमध्ये ‘हे’ छापून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान

शोले मधील ‘सुरमा भोपाली’ची भूमिका गाजवलेले अभिनेते जगदीप जाफरी यांचं निधन

शरद पवारांनी मातोश्रीवर घेतलेल्या भेटीवरुन शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

“राजगृहावर झालेला हा हल्ला म्हणजे महाराष्ट्रधर्मावर झालेला हल्ला आहे”