बीड : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह नगरसेवक धनराज घोगरे यांच्या विरुध्द शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अॅड.संगिता चव्हाण, कृष्णा राठोड यांनी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पूजा चव्हाण हिने पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर चित्रा वाघ, धनराज घोगरे यांनी पिडीतेचे चारित्र्यहनन करुन, बंजारा समाजाची नाहक बदनामी केल्याची तक्रार बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सदरील माहिती प्रसारित करुन त्यांनी पीडीतेच्या कुटुंबियांची बदनामी केली. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुणे येथील पीडीतेच्या बंद घरात घुसून मौल्यवान वस्तू, लॅपटॉप व भ्रमणध्वनी चोरुन त्यामधील संभाषण व अन्य चित्रफितींशी छेडछाड करुन ती समाजमाध्यमातून जाणीवपूर्वक प्रसारीत केली.
दरम्यान, राजकीय उद्देशाने व समाज बांधवांची दिशाभूल करुन जाणीवपूर्वक बदनाम केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
अजित पवारांनी शब्द पाळला; देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला एका दिवसात बेड्या
कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांचा मिश्किली टोला