पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युवराज दाखले नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील थेरगावातल्या जगतापनगर इथं हा प्रकार घडला होता.
आरोपी युवराज दाखले याने देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेला एक व्हीडिओ युट्युबवर प्रसारित केला होता. महत्वाची बाब म्हणजे हा मुद्दा विधानसभेत उचलला गेला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कारवाईचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार अजितदादांनी दिलेला शब्द पुणे पोलिसांनी खरा करुन दाखवला आहे.
दरम्यान, आरोपीकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा दाखले नव्हते. तरीही त्याने फडणवीसांची बदनामी करणाचा व्हिडीओ प्रसारित केला. याबाबत एका 37 वर्षीय महिलेनं फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन आरोपी युवराज दाखलेला अटक केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांचा मिश्किली टोला
“सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”
“मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही”