रवींद्र जडेजाची नाबाद मॅच विनिंग खेळी; चेन्नईचा कोलकातावर शेवटच्या चेंडूवर विजय

0
158

दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा 6 विकेट्सनी पराभव केला.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 172 धावा केल्या. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक 61 चेंडूत 87 धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने 17 चेंडूत 26 धावा, दिनेश कार्तिकने 10 चेंडूत नाबाद 21 धावा, तर कर्णधार इयाॅन माॅर्गनने 12 चेंडूत 15 धावा केल्या. तर चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने 2, तर मिचेल सॅंटनर, रविंद्र जडेजा व कर्ण शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईने हे लक्ष्य अखेरच्या षटकात शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावा, अंबाती रायडूने 20 चेंडूत 38 धावा, रवींद्र जडेजाने 11 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी-

सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं; राधाकृष्ण विखे पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र

“राज ठाकरे यांना सरकारला बोलण्याचा पूर्ण अधिकार, मात्र मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत”

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

“ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here