करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर

0
160

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात पुन्हा हळूहळू कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात असून आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…

कोरोनाबाधितांची आकडेवारी आता 168 वर पोहोचली आहे. यामध्ये कोरोनाच्या नव्या JN-1 व्हेरिएंटने बाधित झालेल्या 10 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट फार जलद गतीने संक्रमित होणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात आली आहे.

दरम्यान, या टास्कफोर्समध्ये दिल्ली आय.सी.एम.आर.चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर, एम.यु.एच.एस. नाशिकच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानीटकर, पुण्याचे बी. जे. मेडीकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकते, नवले मेडीकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार, पुण्याच्या नवले मेडीकल कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम (फिजिशियन) यांच्यासह आणखी काही दिग्गज डॉक्टरांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण

उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा

पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here