Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ

मुंबई : राज्यात सध्या वीजबिल वसुलीचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलाच तापताना दिसत आहे. ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सराकारवर निशाणा साधलाय.

“सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना 50 हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरातील हळदी कुंकू कार्यक्रमात चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी-

बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे- किशोरी पेडणेकर

जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

“माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो”

शिवसेना सगळं बटण दाबून करते; नारायण राणेंची सेनेवर टीका