मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
माझ्या मते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं स्वरुप गंभीर स्वरुपाचं आहे. साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. मुंडे यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक माझ्यापुढे मांडली आहे. मात्र, अशा प्रकरणात निर्णय सर्वानुमते घ्यावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ,असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाहीत- जयंत पाटील
“भारतीय क्रिकेटर हनुमा विहारीचं भाजप खासदाराला खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाला…”
“पोलिसांनी तातडीने सत्य बाहेर आणलं पाहिजे”
नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड