पुणे : राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र आले. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणावेळी हास्याचे कारंजे उडवले. भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. त्यात ते बोलत होते.
यावेळी हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे हे सांगत असताना फडणवीस म्हणाले, जर 2-3 दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर अजितदादा, एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सर्वच जण एकत्र येऊन काम केल्यास पुणे जागतिक स्तरावरची सिटी होईल, असंही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कोरेगाव-भीमाच्या इतिहासाबाबात रामदास आठवलेंची ‘ही’ मोठी मागणी
मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? मातोश्रीबाहेर मनसेचा बॅनर
“कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूड फोटोशूट”
बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका