पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडे समर्थकांसाठी गुडन्यूज!

0
159

मुंबई : भाजपची राज्य कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. मात्र या कार्यकारिणीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाहीये. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना तर एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांना कार्यकारणीमध्ये स्थान मिळालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस सध्या अस्वस्थ आहेत, त्यांचं स्वप्नभंग झाल्यामुळेच ते अशी वक्तव्यं करत आहेत”

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला तरी…; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here