कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा आणि हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपच्याच कार्यकर्त्यांनीच राजिनाम्याची मागणी केल्यामुळे चंद्रकांत पाटलांसमोर होम पीचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”
अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी
“महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”
“महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल”