Home महाराष्ट्र “महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”

“महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”

मुंबई : महिला व बालकांवरील अत्याचारविरोधातील शक्ती विधेयक सोमवारी महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले.

या विधेयकात बलात्कार, अॅसिड हल्ला तसेच समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा व 10 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या विधेयकात अशा प्रकारच्या गुन्ह्यात 15 दिवसांत गुन्ह्यात तपास करावा आणि आरोपपत्र दाखल करावे, तसेच आरोपपत्र दाखल केल्यानंतर 30 दिवसात सुनावणी पूर्ण व्हावी, अशी तरतूद आहे.

महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लाॅ (महाराष्ट्र अमेंडमेंट) अॅक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट मशिनरी फाॅर इम्प्लिमेंटेशन आॅफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लाॅ 2020 अशी 2 विधेयके विधिमंडळासमोर मांडण्यात आली आहेत.

दरम्यान, या विधेयकाला विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात आज मंजूरी मिळणे अपेक्षित आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल”

…यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

“मराठा आंदोलक आक्रमक, मुंबईतील सीएसटी परिसरात ठिय्या आंदोलन”

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तीरस्कार करतंय- गोपीचंद पडळकर